Eknath khadse Claims that ED Inquiry is politically motivated in Bhosari Land Scam

एकनाथ खडसे म्हणाले, भोसरी भूखंडप्रकरणी माझा आणि कुटुंबीयांचा ED कडून छळण्याचा प्रयत्न

Eknath khadse : भोसरी भूखंडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी आता एकनाथ खडसेंचीही चौकशी होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चौकशीवरच मला संशय आहे. ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा वास येत आहे. भोसरीतील ज्या भूखंड खरेदीसंदर्भात माझी चौकशी होतेय. त्याचा आणि एमआयडीसीचा काहीच संबंध नाही. पाच वर्षांपूर्वी झालेला हा खरेदी व्यवहार आहे. तसेच या व्यवहाराची पाच वेळा चौकशीही झाली आहे. असे असताना अजूनही ईडीला या प्रकरणाची चौकशी करावीशी वाटते. यावरून मला आणि माझ्या परिवाराला जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा त्यांनी केला. Eknath khadse Claims that ED Inquiry is politically motivated in Bhosari Land Scam


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोसरी भूखंडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी आता एकनाथ खडसेंचीही चौकशी होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चौकशीवरच मला संशय आहे. ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा वास येत आहे. भोसरीतील ज्या भूखंड खरेदीसंदर्भात माझी चौकशी होतेय. त्याचा आणि एमआयडीसीचा काहीच संबंध नाही. पाच वर्षांपूर्वी झालेला हा खरेदी व्यवहार आहे. तसेच या व्यवहाराची पाच वेळा चौकशीही झाली आहे. असे असताना अजूनही ईडीला या प्रकरणाची चौकशी करावीशी वाटते. यावरून मला आणि माझ्या परिवाराला जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा त्यांनी केला.

जळगावात जाणूनबुजून मेसेज व्हायरल केले

ईडी कार्यालयात चौकशीला हजर होण्याआधी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे म्हणाले की, ‘आज कुछ तो होनेवाला है’ असे मेसेज जळगावमध्ये व्हायरल झाले आहेत. हे मेसेज जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जी चौकशी सुरू आहे त्याला आम्ही सामोरे जाऊ. चौकशीनंतर बाहेर आल्यावर मी आपल्याला माहिती देईन.

पत्रकार परिषद रद्द

एकनाथ खडसे यांची आज पत्रकार परिषद होणार होती, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स आले आहे. या समन्समध्ये त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल (7 जुलै) याबाबत माहिती देताना म्हटले होते की, एकनाथ खडसे हे उद्या पत्रकार परिषद घेतील आणि मग ईडी कार्यालयात चौकशीसाठी जातील. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पुढे आले. त्यामुळे खडसे हे आता ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार का? याबाबत उत्सुकता होती. माध्यमंशी बोलल्यावर खडसे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.

Eknath khadse Claims that ED Inquiry is politically motivated in Bhosari Land Scam

महत्त्वाच्या बातम्या