Hindu – Muslim DNA; द्ग्विजयसिंगांनी उकरून काढला धर्मांतरविरोधी, लव जिहादविरोधी कायद्याचा मुद्दा


वृत्तसंस्था

सिहोर  (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी धर्मांतर विरोधी कायदा आणि लव जिहाद विरोधी कायदा हा मुद्दा पुन्हा उकरून काढाला आहे. हिंदू – मुसलमानांचा DNA जर एकच आहे, हे कायदे कशाला करायचे… त्यांच्या अस्तित्वाला अर्थच काय, असा सवाल दिग्विजय सिंग यांनी केला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या हिंदू – मुसलमानांचा DNA एकच असल्याच्या वक्तव्यावरून दिग्विजय सिंग यांनी वडाचे साल वांग्याला लावण्याचा प्रयत्न केला आहे. If the DNA of Hindus and Muslims is the same, then what is the use of the law against religious conversions? What is the use of the law against ‘Love Jihad’? Then it means that the DNA of Mohan Bhagwat & Owaisi is the same: Congress leader Digvijaya Singh

मध्य प्रदेशातील सिहोर मध्ये एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी वरील मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात, की हिंदू – मुसलमानांचा DNA एकच आहे. याचा अर्थ डॉ. मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा DNA एकच आहे. असे असेल, तर धर्मांतर विरोधी कायदा किंवा लव जिहाद विरोधी कायदा केलेच कशाला… त्यांचा काय उपयोग आहे…??

-मोहन भागवतांचे विधान

The Meetings of Minds: A Bridging Initiative – Dr Khawaja Iftikhar Ahmed’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू – मुसलमान संबंधांवर भाष्य केले होते.

ते म्हणाले होते, की हिंदू – मुस्लीम ऐक्य हा शब्दप्रयोग मूळातच दिशाभूल करणारा आहे. कारण दोन भिन्न समूदायांचे ऐक्य होऊ शकते. भारतातले हिंदू आणि मुसलमान हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. तेही गेल्या ४० हजार वर्षांपासून…!! हे आता सिध्द झाले आहे. सर्व भारतीयांचा DNA सारखा आहे. त्यामुळे हिंदू – मुस्लीम ऐक्य वगैरे शब्दांचा वापर करून अनेकदा हे दोन्ही समाज भिन्न असल्याचे भासविण्याचा प्रयत्न होतो. तो आपण य़शस्वी होऊ देता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

If the DNA of Hindus and Muslims is the same, then what is the use of the law against religious conversions? What is the use of the law against ‘Love Jihad’? Then it means that the DNA of Mohan Bhagwat & Owaisi is the same: Congress leader Digvijaya Singh

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात