नवस पूर्ण झाल्यानंतर ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घालणारा तरुण


विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातला एक तरुण सध्या चांगलाच चर्चेत आलाय. त्याचं कारणही तसंच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा पंतप्रधान व्हावेत, असा नवस त्याने ३३ कोटी देवांना केला होता. आता हा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याने ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घातल्या आहेत. A young man circled around Cow for Thousand Time’s After Fulfillment of vows; Because 33 crore gods are in Cow

श्रीकांत गदळे, असे तरुणाचे नाव आहे. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. नरेंद्र मोदी हे दोनदा पंतप्रधान व्हावेत. त्यानंतर ३३ कोटी देवांना एक हजार प्रदक्षिणा घालेन असा नवस त्याने केला होता. हा नवस पूर्ण करण्यासाठी त्याला दोन दिवस लागले आहेत. गाईमध्ये ३३ कोटी देव असतात, अशी गाढ श्रद्धा आहे. त्यामुळे तिलाच एक हजार प्रदीक्षणा घालून त्याने हा नवस फेडला आहे. यापूर्वी त्याने एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्यासाठी त्याने थेट राज्यपालांना पत्र लिहिले होतं. अन त्याची दखल खुद्द राज्यपालांनी देखील घेतल्याने तो असाच चर्चेत आला होता.

  • ३३ कोटी देवांना प्रदक्षिणा घालण्याचा नवस फेडला
  • गाईत ३३ कोटी देवांचा वास असल्याची गाढ श्रद्धा – – गाईला घातल्या तब्बल एक हजार प्रदक्षिणा
  • प्रदक्षिणा घालण्यासाठी तब्बल दोन दिवस लागले
  • श्रीकांत गदळे, असे नवस फेडणाऱ्याचे नाव
  • बीड येथील एका शेतकऱ्याचा मुलगा
  • एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्यासाठी पत्रव्यवहार
  • मागणीची राज्यपालांनी घेतली होती दाखल

A young man circled around Cow for Thousand Time’s After Fulfillment of vows; Because 33 crore gods are in Cow

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण