विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्याला आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे ५० लाख डोस मिळाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार पुण्याचा लसीकरणात राज्यात दुसरा क्रमांक आहे.Pune district has so far received 50 lakh doses of corona vaccine, 19.68 lakh citizens have received the first dose so far.
आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील ४५ वर्षे वयावरील १९.६८ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ७.८ लाख नागरिकांना लसीचे दोन्हीही डोस देण्यात आला आहेत. अठरा ते ४४ वयोगटातील १५.७१ लाख लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
याच गटातील ४० हजार ७६४ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.पुणे जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत १.५६ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस आणि १.०८ लाख कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस दिले आहेत.
फ्रंटलाईन वर्कर असणाऱ्या २.४५ लाख नागरिकांना पहिला डोस तर १.२३ लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.राज्यात आत्तापर्यंत मुंबईमध्ये सर्वाधिक ६० लाख लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.
ठाण्यामध्ये २७.६५ लाख, नागपूरमध्ये १८ लाख, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत दहा लाखांवर डोस पुरविण्यात आले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात साडेतीन कोटी कोरोना लसी पुरविण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App