EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !

ED Attaches Assests Of Former Home Minister Anil Deshmukh in 100 cr corruption case

Former Home Minister Anil Deshmukh : अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 जुलै) समोर आली होती. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही तब्बल 350 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘टीव्ही 9’ने दिलेल्या वृत्तानुसार 100 कोटी रुपये खंडणीच्या आरोपांवरून अनिल देशमुखांची चौकशी सध्या सुरू आहे. काल ईडीने त्यांच्या दोन मालमत्ता जप्त केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त मालमत्तांची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं म्हटलं होतं. परंतु ही केवळ खरेदीची किंमत असून त्याचे बाजारमूल्य तब्बल 350 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे. ED Attaches Assests Of Former Home Minister Anil Deshmukh in 100 cr corruption case


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 जुलै) समोर आली होती. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही तब्बल 350 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘टीव्ही 9’ने दिलेल्या वृत्तानुसार 100 कोटी रुपये खंडणीच्या आरोपांवरून अनिल देशमुखांची चौकशी सध्या सुरू आहे. काल ईडीने त्यांच्या दोन मालमत्ता जप्त केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त मालमत्तांची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं म्हटलं होतं. परंतु ही केवळ खरेदीची किंमत असून त्याचे बाजारमूल्य तब्बल 350 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

ईडी चौकशीला देशमुखांची गैरहजर

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना तीन वेळा समन्स बजावलेले आहे. त्यांच्या मुलाला – ऋषिकेश देशमुख यांनाही एकदा समन्स बजावण्यात आले होते. तथापि, देशमुख पितापुत्रांनी चौकशीसाठी हजर न राहता ती टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले. त्यांनीही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

ईडीने जप्त केलेली मालमत्ता बाजारभावानुसार 1 कोटी रुपये गुंठा

आता मात्र ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता जप्त केल्या. ईडीने वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्याची खरेदीच्या वेळची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये होती. याशिवाय ईडीने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील 8 एकर 30 गुंठे जमीन जप्त केली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची भागीदारी असलेल्या प्रीमियर पोर्ट लिंक प्रा. ली. या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन 2004 ते 2015 या काळात विकत घेतली. त्या काळात त्यांनी ही जमीन 2 कोटी 67 लाख रुपयांना विकत घेतली आहे. 8 एकर 30 गुंठे म्हणजे एकूण 350 गुंठे जमीन झाली. प्रत्येकी एक कोटी रुपये गुंठा इतकी किंमत असल्याने या जमिनीची किंमत सुमारे 350 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला व अँटिलिया प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मुंबईतील बार आणि रेस्तरांमधून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टारगेट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांनंतर अनिल देशमुखांचे गृहमंत्रिपद गेले. सीबीआय व ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झाले आहेत. त्या अनुषंगाने काही बारमालकांनी सचिन वाझेला पैसे दिल्याचे जबाब नोंदवले आहेत. यानंतर आता ईडीने अनिल देशमुखांची मालमत्ता जप्त केली असून अधिक चौकशी सुरूच आहे.

ED Attaches Assets Of Former Home Minister Anil Deshmukh in 100 cr corruption case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात