वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत, प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केविन मॅकार्थी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोगाची चौकशी सुरू केली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी 2009-17 मध्ये उपराष्ट्रपती असताना त्यांचा मुलगा हंटरला व्यावसायिक सौद्यांमध्ये लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. आता याबाबतचा औपचारिक प्रस्ताव लोकप्रतिनिधी सभागृहात आणला जाणार आहे.impeachment inquiry President Biden, Evidence provided by the Republican Party
मॅकार्थी म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी अनेक फोन कॉल्स, मनी ट्रान्सफर आणि इतर कामांशी संबंधित पुरावे दिले आहेत. यावरून बायडेन कुटुंबाचा भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे सूचित होते. मात्र, यात स्वतः बायडेन यांचा सहभाग होता का, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
हंटर बायडेन यांच्या युक्रेनमधील सौद्यांची चौकशी
बायडेन यांच्याविरुद्धचा तपास हंटर बायडेन यांच्या युक्रेनमधील व्यावसायिक व्यवहारांवर केंद्रित असेल. रिपब्लिकन पक्ष या वर्षांच्या सुरुवातीपासून या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, 2020 मधील सिनेटची तपासणी आणि या वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या तपासणीत बायडेन यांच्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत.
यावर सभागृहाचे अध्यक्ष मॅककार्थी म्हणाले- पुरावे आम्हाला जिथे घेऊन जातील त्या दिशेने आम्ही पुढे जाऊ. रिपब्लिकन पक्षाचे 535 सदस्यीय प्रतिनिधीगृहात 222 सदस्य आहेत. अमेरिकेत आतापर्यंत महाभियोगाद्वारे एकाही राष्ट्राध्यक्षाला पदावरून हटवले गेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर जर बायडेन दोषी आढळले, तर ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना अशा पद्धतीने पद सोडावे लागेल.
रिपब्लिकन पक्षावर युक्रेनमध्ये अवैध आयात-निर्यातीचा आरोप
हंटर हे बीएचआर पार्टनर्स (शांघाय) इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजमेंट कंपनी या चिनी कंपनीचे बोर्ड सदस्य आहेत. याशिवाय हंटर हे बुरिस्मा होल्डिंग्स लिमिटेडचे बोर्ड मेंबरदेखील राहिले आहेत. ही युक्रेनमधील नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे की, या कंपनीच्या माध्यमातून बायडेन युक्रेनमध्ये अवैध आयात-निर्यात करत असत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App