लिबियात वादळ आणि पुरामुळे 7 हजार लोकांचा मृत्यू; चार देशांनी पाठवली मदत; 2 बंधारे फुटून डेर्ना शहर उद्ध्वस्त


वृत्तसंस्था

त्रिपोली : डॅनियल वादळ आणि पुरामुळे आफ्रिकन देश लिबियामध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. वादळानंतर 10 हजार लोकसंख्या असलेल्या डेर्ना शहराजवळील दोन बंधारे फुटले. यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले आहे.7 thousand people died in Libya due to storms and floods; Aid sent by four countries; Derna city destroyed by bursting of 2 dams

अल जझीराने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, देशात आतापर्यंत 6,900 लोकांचा मृत्यू झाला आहे. आकडा वाढण्याची भीती आहे. सौदी वृत्तपत्र ‘द नॅशनल’च्या पत्रकारानुसार, आतापर्यंत 6886 मृतदेह सापडले आहेत. केवळ 700 मृतदेहांची ओळख पटली आहे. 20 हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत.



लिबिया सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, 4 देशांनी तुर्की, इटली, कतार आणि यूएई पूरग्रस्त भागांना मदत करत आहेत. वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि खाद्यपदार्थ येथे पोहोचवले जात आहेत. इजिप्त, जॉर्डन, ट्युनिशिया आणि कुवेत यांनीही मदत करण्याचे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन आणि अमेरिकादेखील आपत्कालीन निधी जारी करत आहेत.

संपूर्ण डेर्ना शहरात पूर, विमानतळ उद्ध्वस्त

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, अनेक भागात मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत आहेत. अनेक घरांमध्ये मृतदेह कुजले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, मृतदेह समुद्रात तरंगताना दिसले आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की मृतांना दफन करण्यासाठीही जागा उरलेली नाही. रस्त्यावर मृतदेह दिसत आहेत.

अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार, बंदर शहर डेर्नाजवळ दोन धरणे होती, जी वादळ आणि पुरामुळे फुटली आहेत. यातील एका धरणाची उंची 230 फूट होती. हे धरण आधी उद्ध्वस्त झाले. अहवालानुसार 2002 पासून या धरणांची देखभाल करण्यात आली नव्हती. बचाव कार्यात गुंतलेल्या 123 जवानांचा ठावठिकाणाही समजू शकलेला नाही. यामुळेच आता लष्करही हतबल दिसत आहे. देशातील निवडक विमानतळे असून कोणत्याही अवजड किंवा मालवाहू विमानांना तेथे उतरण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळेच येथे मदत देणे कठीण होत आहे.

7 thousand people died in Libya due to storms and floods; Aid sent by four countries; Derna city destroyed by bursting of 2 dams

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात