केंद्रीय एजन्सीने दोन रिअल इस्टेट समूह आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर छापे टाकल्यानंतर १८४ कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली.Action against Deputy Chief Minister Ajit Pawar, notice to confiscate assets worth Rs 1000 crore from Income Tax Department
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनेक दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या निशाण्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. पवार यांच्या पाच मालमत्ता जप्त करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने जारी केले आहेत.या मालमत्तांची किंमत एक हजार कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अवघ्या एका दिवसात प्राप्तिकर विभागाने हे पाऊल उचलले आहे.
Income Tax Department has attached properties of Maharashtra Deputy CM Ajit Pawar worth Rs 1000 cr. Five properties including Nirmal Tower at Nariman Point, Mumbai has been attached by IT Dept. Last month, IT Dept conducted raids at houses& companies of sisters of Pawar: Sources pic.twitter.com/WaCD71BfIa — ANI (@ANI) November 2, 2021
Income Tax Department has attached properties of Maharashtra Deputy CM Ajit Pawar worth Rs 1000 cr. Five properties including Nirmal Tower at Nariman Point, Mumbai has been attached by IT Dept. Last month, IT Dept conducted raids at houses& companies of sisters of Pawar: Sources pic.twitter.com/WaCD71BfIa
— ANI (@ANI) November 2, 2021
अजित पवार दीर्घकाळापासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत.७ ऑक्टोबर रोजी विभागाकडून त्यांच्या ७० हून अधिक तळांवर छापे टाकण्यात आले. केंद्रीय एजन्सीने दोन रिअल इस्टेट समूह आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर छापे टाकल्यानंतर १८४ कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली, या मालमत्तेचा कोणताही हिशेब नव्हता, त्यानंतर विभागाकडून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आयकर विभाग अजित पवारांच्या पाच मालमत्ता ताब्यात घेणार आहे.त्याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १)जरंडेश्वर साखर कारखाना – बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी २) दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी ३)पार्थ पवार यांचे निर्मल कार्यालय – बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी ४) गोव्यात बांधलेले रिसॉर्ट – बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी ५)महाराष्ट्रातील २७ वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी – बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी या मालमत्ता आयकर विभाग जप्त करणार आहेत. या मालमत्तांची किंमत १००० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App