सिंहगड रोड रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेचा खून करून घरामधून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. Thieves rage in Pune, murder 70-year-old woman
विशेष प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रोड रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेचा खून करून घरामधून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.
शालीनी बबन सोनावणे (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या मुलाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा हिंगणे खुर्द परिसरात राहतो. त्यांची आई शालीनी या देखील त्यांचे समोरील सोसायटीत एकट्या राहत होत्या. शनिवारी रात्री घरी आल्यानंतर सोनवणे रात्री साडे नऊ वाजता आईकडे गेले.
त्यावेळी त्यांना आई हॉलमध्ये पडल्याची दिसून आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी घरातून पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
शालीनी यांच्या गळ्यात ४ ते ५ तोळे सोने होते.ते तसेच होते. त्याला हात लावला गेला नाही. कपाटात रोकड व इतर दागिने देखील होते, तेही तसेच आहेत. त्यामुळे हा खून जवळच्या कोणी केला आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App