
प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नुकतेच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. सध्या आर्यन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनचे वकील त्याला जामीन देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.Jackie Chan also apologized after his Sons arrest in drug case’, Kangana Ranaut targets Shah Rukh Khan without naming
यावर आता बॉलीवूडची बिनधास्त क्वीन कंगनानेही भाष्य केले आहे. हृतिक रोशनपासून पूजा भट्टपर्यंत सर्व सेलेब्स शाहरुखच्या बाजूने आले आहेत. पण कंगना राणावतने शाहरुखचे नाव न घेता या प्रकरणावर भाष्य केले आहे.
अलीकडेच जेव्हा हृतिक रोशनने आर्यन खानला पाठिंबा दिला होता, तेव्हा कंगनाने त्याला विरोध केला होता, आता अभिनेत्रीने जॅकी चॅनचे उदाहरण देऊन शाहरुखला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.यापूर्वी जॅकी चॅनचा मुलगा जेसी चॅनला ड्रगच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर जॅकीने संपूर्ण जगाची माफी मागितली.
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कंगनाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जॅकी चॅन आणि त्याचा मुलगा दिसत आहेत. एवढेच नाही, तर अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले, ‘जॅकी चॅनने 2014 मध्ये त्याच्या मुलाला ड्रगच्या प्रकरणात अटक केल्यावर अधिकृतपणे माफी मागितली.
जॅकी म्हणाला होता की, ‘मला मुलाच्या कृत्याची लाज वाटते, हे माझे अपयश आहे आणि मी त्याच्या संरक्षणासाठी हस्तक्षेप करणार नाही.’ यानंतर त्याच्या मुलाला 6 महिने तुरुंगवास झाला आणि त्याने माफीही मागितली. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत लिहिले
Jackie Chan also apologized after his Sons arrest in drug case’, Kangana Ranaut targets Shah Rukh Khan without naming
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर