Actor Ajaz Khan arrested by NCB in drug case

ड्रग्जप्रकरणी अभिनेता एजाज खानला एनसीबीकडून अटक, बटाटा गँगशी संबंधांचा संशय, अनेक ठिकाणी छापेमारी

Actor Ajaz Khan arrested by NCB in drug case : अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक झाल्यानंतर अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. आज एजाज खान राजस्थानहून मुंबईला परतला, त्यानंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतले. एजाज खानवर बटाटा गँगचा भाग असल्याचा आरोप आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक जागांवर छापे टाकत आहे. Actor Ajaz Khan arrested by NCB in drug case, suspected links with Batata Gang, raids in several places


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक झाल्यानंतर अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. आज एजाज खान राजस्थानहून मुंबईला परतला, त्यानंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतले. एजाज खानवर बटाटा गँगचा भाग असल्याचा आरोप आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक जागांवर छापे टाकत आहे.

एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला अटक केली होती, त्याच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त करण्यात आली होती.

मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरविल्याचा आरोप शादाब बटाटावर आहे. फारुख सुरुवातीच्या काळात बटाटे विक्रीचा व्यवसाय करायचा. त्यावरून त्याला बटाटा हे नाव पडले. त्यावेळी तो अंडरवर्ल्डमधील काही लोकांच्या संपर्कात आला. आता तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर बनलाय. या ड्रग्ज वर्ल्डचे संपूर्ण काम आता त्याची दोन मुले पाहतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वात आधी बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला होता. यानंतर एनसीबीने या प्रकरणात लक्ष घालून आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. याशिवाय कित्येक ड्रग्ज पेडलर्सना तुरुंगात टाकले आहे.

Actor Ajaz Khan arrested by NCB in drug case, suspected links with Batata Gang, raids in several places

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*