वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आजोळ इटली हा देश आहे. तेथे जागतिक शांतता परिषद आयोजित केली आहे. त्यासाठी पाश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जायचे होते. पण, त्यांना केंद्र सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे त्या सरकारवर जाम संतापल्या आहेत. Mamata Banerjee denied permission to go to Itali ; She was outraged by the central government’s decision
इटलीची राजधानी रोम येथे ही परिषद आयोजित केली आहे. त्यासाठी अख्ख्या भारतातून फक्त ममता बॅनर्जी यांनाच परिषदेला हजर राहावे, असे खास निमंत्रण पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांनी जाण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी मागितली. पण, ती नाकारण्यात आली. त्यामुळे त्या संतप्त झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला मी कधी विरोध केला नाही. पण माझ्या परदेश दौऱ्याला विरोध का होतो? असा सवाल त्यांचा आहे. या पूर्वी त्याच्या एका परदेश दौऱ्याला विरोध करण्यात आला होता. तेव्हाही त्या संतप्त झाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App