विशेष प्रतिनिधी
मुंबई:बुधवारी (16 जून) शिवसेना भवनासमोर राडा करणार्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.याच शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला लाथेने मारहाण केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर, माहीम, वडाळा भागातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं आहे .दरम्यान राडा करत गोंधळ घालणार्यांचे कौतुक एका राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री कसे करू शकतात असा सवाल उपस्थित होत आहे .Shiv Sena-BJP Rada: When the head of the state stands with those doing Rada; Chief Minister Thackeray himself saw the video of the fight and appreciated it!
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे,असं झी 24 तासच्या बातमीत म्हटलंय.
शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख… pic.twitter.com/zmyDgBFOU0 — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 17, 2021
शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख… pic.twitter.com/zmyDgBFOU0
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 17, 2021
शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्यासह 25 ते 30 शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तुमच्या मारामारीचे व्हीडिओ आपण पाहिल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली, असं बातमीत म्हटलं आहे.
शिवसेनेने आपल्या ट्विटर हँडलवरुन या भेटीचे फोटो पोस्ट करत शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख अशी कॅप्शन दिली आहे.
भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेली शिवसैनिकांची भेट ही वेगळेच संकेत देत आहे. या भेटीने उद्धव ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसैनिकांचं कौतुक करत त्यांचं समर्थन केल्याचं दिसून येतंय
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App