कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.Prostitution of actresses to provide expensive lust due to financial crisis in Corona
विशेष प्रतिनिधी
ठाणे : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला
असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होत नसल्याने त्या वेश्याव्यवसायाकडे वळल्या.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या.
याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसायाकरता आल्या होत्या. वेश्या व्यवसाय करण्यासाठी या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या.वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळे केले जात होते.
फक्त या दोन अभिनेत्रीच नाही तर आणखीही अनेक अभिनेत्री वेश्या व्यवसाय करतात असे या दोघींच्या चौकशीतून उघड झाले आहे. बॉलिवूडमधील तसंच टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री मुंबई आणि ठाण्याच्या वेश्या व्यवसाय एजंटच्या संपर्कात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App