विशेष प्रतिनिधी
मुंबई / पुणे: पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिवंगत नेते अजित पवार यांच्याप्रमाणे काम करत नसल्याचा दावा केला होता. रोहित पवारांच्या या विधानांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत, रोहित पवार यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘सुनेत्रा पवारांनी कमी काळात प्रशासनावर पकड मिळवली; रोहित पवारांनी स्वतःची पत घालवून घेतली’
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, रोहित पवार हे राज्याचे संस्कार आणि संस्कृती विसरले असून, सुनेत्राताई पवार यांना प्रशासन चालवता येत नाही किंवा पालकमंत्रिपद सांभाळता येत नाही असे बोलणे त्यांना शोभत नाही. अनेकजण 25-25 वर्षे आमदार-खासदार राहूनही प्रशासनावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत, मात्र राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या सुनेत्रा पवार यांनी खूप कमी काळात पक्ष आणि प्रशासनावर पकड तयार केली असून मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुनेत्रा पवार यांनी पुण्यात चांगल्या पद्धतीने काम सुरू केले असून, त्यांच्याबद्दल असे बोलून रोहित पवारांनी स्वतःचीच पत घालवून घेतल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
फडणवीसांवरील टीकेवरूनही बावनकुळे आक्रमक; ‘सुनेत्रा पवार पालकमंत्रिपदासाठी सक्षम’
पुण्याचे पालकमंत्री फडणवीस झाले तर जिल्ह्याचे वाटोळे होईल, या रोहित पवारांच्या विधानाचा समाचार घेताना बावनकुळे यांनी रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत असल्याची टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा मोठा अनुभव असून त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात; मात्र केवळ राजकारणासाठी प्रत्येक ठिकाणी टीका करणे योग्य नाही, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. तसेच, देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार नसून या जबाबदारीसाठी सुनेत्रा पवार या पूर्णपणे सक्षम आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App