विशेष प्रतिनिधी
नांदेड: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या आणि खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर तीव्र टीका केली आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर 2026) नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी आरोप केला की, रोहित पवारांचा शेतकरी मोर्चा आणि सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा या सगळ्याची स्क्रिप्ट दिल्लीतून लिहून आल्यासारखी वाटते. जर सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या, तर शरद पवार यांच्या आजवरच्या राजकारणाची विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि पवार कुटुंबाभोवती असलेले राजकीय वलयही संपेल, असे वक्तव्य हाके यांनी केले. Laxman Hake
रोहित पवारांच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह; ‘धडपड मंत्रिपदासाठी की शेतकऱ्यांसाठी?’
आमदार रोहित पवार यांच्या आगामी शेतकरी मोर्चावर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या हेतूवरच संशय व्यक्त केला:
उद्योगपती आणि शेतकरी अशा परस्परविरोधी भूमिका: लक्ष्मण हाके यांनी प्रश्न उपस्थित केला की, रोहित पवार एका बाजूला साखर कारखाने, वायनरी आणि डिस्टलरी चालवतात, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या नावाने मोर्चा काढतात; स्वतःचे अनेक कारखाने असताना त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्याचे नैतिक बळ कोठून येते?
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
राजकीय जागा शोधण्याचा प्रयत्न: रोहित पवार सध्या राजकारणात स्वतःची जागा (स्पेस) शोधत असून, सनसनाटी निर्माण करणे आणि राज्यात विरोधक म्हणून फक्त मीच काम करतोय असे दाखवणे हा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा हाके यांनी केला; तसेच त्यांची ही धडपड मंत्रिपदासाठी आहे की खरोखर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, हे काही दिवसांतच समोर येईल, असेही ते म्हणाले.
‘जनतेला संभ्रमात टाकणे हे पवार कुटुंबाचे लक्षण’; VSR विमानांच्या वापरावरूनही टोला
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांवर आणि व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या वादावर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेला नेहमी संभ्रमात टाकणे हे पवार कुटुंबाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकीकडे शरद पवार दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन पुरोगामी आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे असल्याचे सांगतात; त्यामुळे पवार कुटुंबाच्या कोणत्याही भूमिकेवर विश्वास ठेवण्यापूर्वी जनतेने विचार करावा, अशी टीका हाके यांनी केली. तसेच, व्हीएसआर विमान कंपनीसोबत सर्वाधिक संबंध पवार कुटुंबाचेच राहिले असून अजित पवार आणि खुद्द रोहित पवारही याच कंपनीच्या विमानांचा वापर करायचे; मात्र आता तेच रोहित पवार मफलर दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत असल्याचा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App