विशेष प्रतिनिधी
मुंबई: महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार करावी लागणारी धावपळ थांबावी आणि स्थानिक पातळीवरच जलद सेवा मिळावी, यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला अंतिम स्वरूप दिल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट लाभ नागपूर आणि नाशिक विभागातील 6 जिल्ह्यांतील नागरिकांना होणार आहे.Maharashtra Government Decision,
‘या’ 6 जिल्ह्यांतील 9 ठिकाणी सुरू होणार नवीन कार्यालये
प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नागपूर, गडचिरोली, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 6 जिल्ह्यांमध्ये ही नवीन अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित केली जाणार आहेत:Maharashtra Government Decision,
नागपूर विभाग: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) येथे, तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन केले जाणार आहे.
नाशिक विभाग: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा येथे, तर जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव या तीन ठिकाणी नवीन कार्यालये सुरू होतील.
महसुली कामांचे स्वतंत्र अधिकार; मात्र निवडणूक व निराधार योजनेची कामे मूळ तहसीलकडेच
या नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जमिनीशी व महसुलाशी संबंधित कामांचे स्वतंत्र अधिकार दिले जाणार असल्याने स्थानिक पातळीवरच अर्ज आणि कागदपत्रांची प्रक्रिया पार पडेल. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. मात्र, निवडणूक, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर बिगरमहसुली स्वरूपाची कामे पूर्वीप्रमाणेच मूळ तहसीलदार कार्यालयामार्फत केली जातील; अशा स्वरूपाचे अर्ज नवीन कार्यालयात आल्यास ते पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसील कार्यालयाकडे वर्ग केले जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App