अजितदादांशिवाय पहिला पाडवा; पवार कुटुंबीयांकडून स्मृतिस्थळी अभिवादन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ, जय आणि कायनात धार यांनी वाहिली आदरांजली

विशेष प्रतिनिधी

बारामती : दिवाळी पाडवा म्हटले की बारामतीतील गोविंदबाग आणि पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी हे चित्र ठरलेले असायचे. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा प्रथमच हा पाडवा त्यांच्या अनुपस्थितीत होत आहे. त्यामुळे दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला यंदा दुःखाची किनार लाभली आहे.

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आज सहकुटुंब अजितदादांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी पार्थ पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या वाग्दत्त वधू कायनात धार उपस्थित होत्या.



कुटुंबीयांनी स्मृतिस्थळी पुष्प अर्पण करून अजितदादांना आदरांजली वाहिली. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक येत असत. पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये होणारा संवाद हे बारामतीतील राजकीय आणि सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य होते. मा

त्र, यंदा अजितदादांच्या निधनामुळे या परंपरेतील उत्साहाला विराम मिळाला आहे. यंदा नेहमीप्रमाणे पाडव्याचा सोहळा होत नसला, तरी अजितदादांवर प्रेम करणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करत आहेत. त्यामुळे बारामतीत यंदाचा पाडवा उत्सवापेक्षा आठवणींचा ठरत आहे.

First Padwa without Ajitdada; Pawar family pays tribute at the memorial site

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात