‘एसआयआर’मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यांतील मतदारांना पुन्हा नाव नोंदवता येणार:निवडणूक आयोगाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान (एसआयआर) ‘अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार’ असा शेरा मारल्याने ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली होती, त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांतील मतदारांना होणार आहे.

ज्या मतदारांना प्रगणक अर्ज देण्यात आले होते, परंतु ते अर्ज प्रशासनाकडे वेळेत परत न आल्याने त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. Voters in 7 state



…तरीही कारवाई नाही

निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे की, जर तुमचे नाव यादीतून वगळले गेले असेल आणि तुम्ही पुन्हा नोंदणीसाठी फॉर्म ६ भरला, तर केवळ तुम्ही जुने मतदार आहात या कारणावरून तुमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. यासाठी एकच महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे संबंधित मतदाराचे नाव इतर कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघात नोंदवलेले नसावे. त्यामुळे मतदारांना पुन्हा यादीत येता येणार आहे.

या ७ राज्यांमध्ये ४.५२ कोटी नावे मसुदा यादीतून वगळली

महाराष्ट्रात २.०७ कोटी, तेलंगणामध्ये ७३.३९ लाख, दिल्लीत ४७.५६ लाख, आंध्रात ४४.८९ लाख, झारखंडमध्ये ४३.६१ लाख, हरियाणामध्ये ३३.८४ लाख, नागालँडमध्ये १.५८ लाख नावे होती.

दिल्लीत १९.३३ लाख, तेलंगणामध्ये ६०.५१ लाख आणि झारखंडमध्ये ४५.५ लाख मतदारांच्या नोंदींमध्ये तार्किक विसंगती आढळल्या होत्या.

Voters in 7 states, including Maharashtra—who were excluded from the ‘SIR’—will be able to register their names again.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात