विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आखलेल्या ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (जेआयसीए) सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. Marathwada Water Grid Project
फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जायकाच्या शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या वेळी या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल गतीने तयार करून केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होते.
संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिवला पहिला टप्पा
या प्रकल्पाचा पहिला टप्पा छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या ४ जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. अतिरिक्त पाणी असलेल्या धरणांमधून पाणीटंचाई असलेल्या भागातील धरणांपर्यंत पाइपलाइनचे जाळे विस्तारले जाणार आहे.
भूकंपप्रवण भागात जपानी तंत्रज्ञानाचे बळ मिळणार
भूकंपप्रवण लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात या प्रकल्पाच्या बांधकामात जपानी तंत्रज्ञानाचा विशेष वापर केला जाणार आहे. डक्टाइल आयर्न पाइप्स, आधुनिक पंपिंग सिस्टिमसह भूकंपरोधक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App