शासकीय कार्यक्रमातून डावलले, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना खासदार देवरांचे खरमरीत पत्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवलेल्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी वाटप कार्यक्रमातून डावलल्याबद्दल शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमाला खासदार म्हणून निमंत्रण मिळाले नसल्याबद्दल देवरा यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. भविष्यात शासकीय कार्यक्रमांवेळी शिष्टाचार पाळला जावा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा खासदार देवरा यांनी व्यक्त केली. MP Deora

मुंबई महापालिकेकडून शुक्रवारी कुलाबा येथे आश्रय योजनेतील लाभार्थींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चावी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, पालिकेतील गटनेते व पालिका अधिकारी उपस्थित होते.



मात्र दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे दोनवेळा माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार मिलिंद देवरा यांना निमंत्रण देण्यात आले नाही. राज्यसभेचे विद्यमान खासदार असतानाही निमंत्रण न दिल्याने देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहलेल्या पत्रात खासदार देवरा यांनी नाराजी व्यक्त केली.

विकास प्रकल्पांच्या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींचा मानसन्मान राखला गेला पाहिजे. भविष्यात शासकीय कार्यक्रमात मुंबई महापालिकेकडून लोकप्रतिनिधींना निमंत्रण आणि मानसन्मान दिला जाईल, अशी अपेक्षा खासदार देवरा यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Excluded from government event: MP Deora writes a sharp letter to Municipal Commissioner Ashwini Bhide

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात