ठाकरे बंधूंच्या आंदोलनामागे नेमका हेतू काय? नितेश राणेंचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून ते मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेपर्यंत विविध मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची नावे मतदार यादीत कायम राहावीत, यासाठीच ठाकरे आंदोलन करत असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात, हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे म्हणत राणे यांनी फडणवीस यांची पाठराखण केली. दुसरीकडे, मतदार यादीच्या SIR प्रक्रियेवरून ठाकरे गटाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे सेनेने SIR प्रक्रियेवर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही प्रक्रिया योग्य वाटत होती; मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ती चुकीची वाटू लागली, अशी टीका त्यांनी केली. तसेच, हिंमत असेल तर महेश सावंत यांचा राजीनामा घ्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.



हिंदू सणांच्या काळातील आंदोलनांवरून टीका

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसारख्या हिंदू सणांच्या काळातच आंदोलन करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो का, असा सवाल राणे यांनी केला. ईद आणि मोहरमच्या वेळी अशाच प्रकारचे आंदोलन करण्याची हिंमत का दाखवली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुंबई बंद करण्याचे दिवस आता संपले आहेत, असे म्हणत त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली.

बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांना पाठिंबा देऊन राजकीय कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल राणे यांनी केला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले असते, तर ते खरे ठाकरे वाटले असते, अशी टीकात्मक टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, SIR प्रक्रिया, मतदार यादीतील नोंदी आणि आंदोलनाच्या राजकीय भूमिकेवरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत.

What is the exact motive behind the Thackeray brothers’ agitation? Nitesh Rane makes a serious allegation.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात