विशेष प्रतिनिधी
पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे या त्यांच्या गावी रात्री साडेअकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा मल्हारने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित जनसमुदायाने ‘नाना साहेब अमर रहे’ तसेच ‘नाना साहेब परत या’ अशा घोषणा दिल्या. अंत्यसंस्कारापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंसह इतर मंत्री व मान्यवरांनी नाना पाटेकर यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. Nana Patekar
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील भोरमधील डोणजे येथील शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Nana Patekar
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय आम्ही केला आहे. Nana Patekar
समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सिद्धहस्त कलावंत, मार्गदर्शक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले. ज्येष्ठ अभिनेते, माझे मित्र नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.Nana Patekar
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App