आम्ही निवडणूक आयोगाबाबत बोलतोय, यांना का त्रास होतो? राज ठाकरे यांचा भाजपला सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबइ : आम्ही निवडणूक आयोगाबाबत बोलतोय, यांना का त्रास होतो?” असा सवाल भाजपला करत निवडणूक आयोगाच्या विषयाकडे केवळ पक्षीय पराभव किंवा विजयाच्या चौकटीत पाहू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. Raj Thackeray

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली.

“हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सत्तेच्या स्पर्धेचा नसून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, सर्वांच्या हातात फक्त राष्ट्रध्वज तिरंगाच फडकेल,” असे त्यांनी सांगितले.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


मोर्चाचे नियोजन आणि मार्ग स्पष्ट करताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “येत्या 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भायखळा येथील ‘रिचर्डसन अँड क्रुडास’ कंपनीच्या आवारातून हा संयुक्त मोर्चा सुरू होईल. साधारणपणे 11 ते 11.30 वाजेपर्यंत मोर्चेकरी एकत्र येतील. तिथून हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पोहोचेल. तिथे व्यासपीठ उभारण्यात आले असून मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होईल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. सर्वांच्या हातात केवळ तिरंगा असेल. कारण हा प्रश्न देशातील लोकशाही, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करण्याचा आहे.” या मोर्चासाठी आम्ही राज्यातील सर्व राजकीय पक्षांना जाहीर आमंत्रण देत आहोत. सत्ताधारी पक्षातील कोणाला आपल्यासोबत यायचे असेल, तर त्यांचेही स्वागत आहे. कोणालाही औपचारिक पत्र पाठवण्याऐवजी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना स्वतः फोन करून थेट संवाद साधला जाईल.”

विरोधी पक्षांमधील कथित स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेसने आंदोलन केले, 2 ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन होत आहे आणि 4 ऑक्टोबरला आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. या आंदोलनांमध्ये कसलीही चढाओढ किंवा स्पर्धा नाही. मुद्दा लोकशाहीचा आहे. उद्या एखाद्या सोसायटीतील नागरिकांनी जरी बाहेर पडून निवडणूक आयोगाचा निषेध केला तरी ते योग्यच आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने जनजागृती करणे काळाची गरज आहे. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण आणि जाहीर पाठिंबा आहे. यापूर्वी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनालाही आम्ही पाठिंबा दिला होता. लोकशाही वाचवण्यासाठी जो कोणी मैदानात उतरेल, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. सगळ्यांनी आपापल्या स्तरावर जनतेला जागे करावे. यानंतरही जर निवडणूक आयोगाने आपली मनमानी थांबवली नाही, तर सर्वांना एकत्र घेऊन सरकारवर एक जोरदार ‘भीमटोला’ लगावू.”

राज ठाकरे म्हणाले, “आम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून, मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न मांडतो. पण शेवटी मतदार यादीत बोगसगिरी आणि मॅनिपुलेशन करून मतदारांच्या मतांची चोरी केली जात असेल, तर हा जनतेचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे. आजचा लढा हा केवळ आणि केवळ ‘एसआयआर’ आणि देशातील निवडणूक व्यवस्थेतील गैरकारभाराविरुद्ध आहे.”

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक निवडणूक आयोगावर आरोप करत असल्याची टीका होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर राज ठाकरे यांनी आपण अनेक वर्षांपासून निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “2017-18 मध्ये मी स्वतः ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. 4 ऑक्टोबरच्या मोर्चानंतर या लढ्याची पुढील राष्ट्रीय रूपरेषा ठरवली जाईल.”

We are questioning the Election Commission, why is BJP upset?” Raj Thackeray asks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात