राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद सुरू? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात थेट संवाद सुरू असल्याचा दावा शिवासेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे .“यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. विरोधी पक्षातील नेते एकमेकांशी संवाद साधत आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधातील लढा हा संविधान आणि लोकशाही संस्थांच्या संरक्षणासाठी असल्याची आमची भूमिका आहे,” असे राऊत म्हणाले. Sanjay Raut claims Raj Thackeray

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्या संयुक्त जनमोर्चाचा उल्लेख करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन केले जाणार आहे. 4 ऑक्टोबरच्या संयुक्त मोर्चाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.

राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे असंतोष वाढत आहे. ही आंदोलनाची लाट मुंबईपुरती मर्यादित राहणार नसून दिल्लीपर्यंत पोहोचेल, असा दावा त्यांनी केला.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


4 ऑक्टोबरचा मोर्चा, 2 ऑक्टोबरपासूनही आंदोलन

राऊत यांनी सांगितले की, 2 ऑक्टोबरपासून अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी नियोजित आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे दिपके यांनी सांगितल्यानंतर त्यांनी गांधी जयंतीला मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे.

यानंतर 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत स्वतंत्र जनमोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी हा मोर्चा केवळ पक्षांचा नसून नागरिकांचा असल्याचे म्हटले आहे.
“4 ऑक्टोबरच्या आत सरकार निर्णय घेईल असे वाटत नाही. मात्र आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारला पावले उचलावी लागतील,” असे राऊत यांनी म्हटले.

विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर समन्वय वाढवला आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, INDIA आघाडीच्या नेत्यांची या विषयावर महत्त्वाची बैठक 30 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित आहे. या बैठकीत ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवार महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केले.

“शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. सहकार, साखर कारखाने किंवा कौटुंबिक विषयांवरील भेटींना राजकीय अर्थ देणे योग्य नाही,” असे राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगावर विरोधकांचे आरोप, आयोगाकडून इन्कार

निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रिया आणि मतदार यादी पुनरीक्षणावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू आहे. विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले असून संस्थेतील मतभेद हे निर्णयप्रक्रियेचा सामान्य भाग असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएतील अनेक घटक पक्षांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानेही सहमती दर्शवली आहे.

Sanjay Raut claims Raj Thackeray and Rahul Gandhi are in talks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात