महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील निवडणुका रद्द करून मतपत्रिकेवर फेरनिवडणूक घ्या; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई: निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांबाबत वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. आयोगाचे काम आता ‘टोळीसारखे’ सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील मागील निवडणुका रद्द करून मतपत्रिकेद्वारे नव्याने निवडणुका घेण्याची मागणीही ठाकरे यांनी केली. Uddhav Thackeray

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करताना ठाकरे यांनी पक्षांचे नाव आणि चिन्ह यासंदर्भात आयोगाने घेतलेल्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात आयोगाने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत, आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला. तृणमूल काँग्रेसच्या संदर्भातील अलीकडील घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केला.



ठाकरे यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील मागील निवडणुका रद्द करून त्या पुन्हा मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरून हटवून कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले. न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ठाकरे म्हणाले की, “निवडणूक आयोगाचे काम एका टोळीसारखे सुरू आहे. ही टोळी संपूर्ण देशात हैदोस घालत असून, पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि लोकशाहीचा खून करणे हेच त्यांचे काम आहे. या संपूर्ण टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार असून, त्यांचा विद्रूप आणि भीषण चेहरा आता जगासमोर आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ तुरुंगात टाकले पाहिजे.

ठाकरे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत तब्बल ४५ लाख बोगस मतदार यादीत नव्याने घुसडण्यात आले आहेत. ज्यांच्यामुळे हे आज सत्तेची गादी भोगत आहेत, त्या लालकृष्ण अडवाणी यांचेच नाव यादीतून वगळले गेले आहे. आपल्याला हवे ते मतदार ठेवायचे आणि नको ते वगळायचे, असा भयंकर प्रकार सुरू आहे.”

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत मतदार नोंदणी, नावांची भर आणि वगळणी, अर्ज क्रमांक 6 मधील बदल तसेच मतदार डेटाशी संबंधित तांत्रिक प्रणालींच्या केंद्रीकरणासंदर्भात किमान 14 वेळा आक्षेप नोंदवले. काही मुद्द्यांवर त्यांनी निर्णय ‘अनधिकृत’ किंवा कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण करणारा असल्याचे नोंदवल्याचे वृत्तात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांचे आभार मानत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराबाबतच्या बाबी समोर आणल्याचा दावा केला. सर्व विरोधी पक्षांनी लोकशाहीच्या प्रश्नावर एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Cancel the elections and hold a re-election using ballot papers; Uddhav Thackeray’s demand.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात