विशेष प्रतिनिधी
पुणे: ज्येष्ठ हिंदी अभिनेते जितेंद्र यांनी पुण्यातील प्रसिद्ध राजाराम मंडळाला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीबाबत खंत व्यक्त केली.
जितेंद्र यांनी सांगितले की, नेहमीपेक्षा प्रवासाला खूप जास्त वेळ लागला. “सगळे इकडून तिकडे घुसत आहेत. मला दीड तास लागला. पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे,” असे ते म्हणाले.
दर्शनासाठी येताना रस्त्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे मोठा खोळंबा झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे नियोजित वेळेत पोहोचता आले, अन्यथा प्रवासाला तब्बल तीन तास लागू शकले असते, असेही त्यांनी नमूद केले.
या अनुभवातून त्यांनी पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्येकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.संवादादरम्यान जितेंद्र यांनी बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. पूर्वी चाळीत शंभर कुटुंबे एकत्र गुण्यागोविंदाने राहत असत, मात्र आज अनेकदा शेजारी कोण राहते हेही माहित नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गणपती बाप्पाकडे मनःशांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App