‘नरेंद्र मोदी म्हणजे एक विद्यापीठ’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील सेवापूर्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपुरात ‘एक दिवा आशीर्वादाचा’ उपक्रम आयोजित करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या सुमारे 500 लाभार्थ्यांनी दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. Devendra Fadnavis

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वशैलीचा उल्लेख करत, “नरेंद्र मोदी म्हणजे एक विद्यापीठ आहे. त्यांच्या कामकाजातून आणि नेतृत्वातून सतत काहीतरी शिकता येते,” असे म्हटले.



फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी ‘हेड ऑफ द स्टेट’ म्हणून 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून हा प्रवास सेवा आणि विकासाशी जोडलेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 25 वर्षांच्या सेवापूर्तीच्या पार्श्वभूमीवर ‘एक दिवा आशीर्वादाचा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वशैलीबाबत बोलताना फडणवीस यांनी त्यांची तुलना विद्यापीठाशी केली. मोदी यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून, प्रशासनातून आणि नेतृत्वातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील विविध समाजघटक आणि क्षेत्रांशी मोदी यांनी व्यापक संपर्क निर्माण केल्याचेही फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एक दिवा आशीर्वादाचा’ उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी योजनांचे लाभार्थी एकत्र आले. अशाच प्रकारचे कार्यक्रम राज्यातील तसेच देशातील विविध भागांत होत असून, लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

‘Narendra Modi is a university,’ says Maharashtra CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात