जरांगेंना भरत गोगावले यांचा इशारा; “आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही गप्प बसणार नाही!”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवरून सत्ताधारी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषेचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा थेट इशारा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिला आहे. Manoj Jarange

“मनोज जरांगे राजकारणावर बोलले तर आम्हीही उत्तर देऊ. आम्हीही मराठे आहोत आणि आमच्यावरही केसेस आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत बोलत असाल, तर जशास तसे उत्तर देऊ. सांगून टाका त्याला, हा रायगडच्या मावळ्याचा इशारा आहे,” अशा शब्दांत गोगावले यांनी जरांगेंना सुनावले.

‘आरक्षणावर बोला, पण आमच्या नेत्यांवर टीका सहन करणार नाही’

हैदराबाद गॅझेट, मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यास आमची हरकत नाही. मात्र, सरकारमधील नेत्यांवर व्यक्तिगत पातळीवर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही, अशी भूमिका गोगावले यांनी मांडली.



एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासह अनेक निर्णय घेतले असून, हजारो तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच ‘सारथी’च्या माध्यमातूनही मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा गोगावले यांनी केला.

प्रताप सरनाईकांचाही जरांगेंना इशारा

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही तुम्हाला साहेब म्हणून बोलतो. आम्हीही कार्यकर्ते आहोत. मात्र आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असाल, तर आम्हीही रस्त्यावर उतरू शकतो,” असा इशारा सरनाईक यांनी दिला.

दरम्यान, सरकारने जरांगेंच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी जरांगे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावत एकही मागणी मान्य झालेली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

‘Will give a fitting reply’: Bharat Gogawale warns Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात