राज्यात १५ ऑगस्ट रोजी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ, पुणे येथे राज्यपाल तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

flag hoisting

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार,  १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. flag hoisting

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई शिंदे (ठाणे), उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (बीड), चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे (नागपूर), राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील (अहिल्यानगर), हसन समिना मियालाल मुश्रीफ (नंदुरबार), चंद्रकांतदादा सरस्वती बच्चू पाटील (सांगली), गिरीष गिता दत्तात्रय महाजन (नाशिक), गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक (पालघर), गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील (जळगाव), दादाजी रेश्माबाई दगडू भुसे (अमरावती), संजय प्रमीला दुलीचंद राठोड (यवतमाळ), उदय स्वरुपा रविंद्र सामंत (रत्नागिरी), जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल (धुळे), पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे (जालना), अतुल लिलावती मोरेश्वर सावे (नांदेड),



डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके (चंद्रपूर), शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई (सातारा), ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार (मुंबई उपनगर), दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे (वाशिम), शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले (लातूर), जयकुमार कमल भगवानराव गोरे (सोलापूर), नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ (हिंगोली), संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट (छत्रपती संभाजीनगर), प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक (धाराशिव), भरत शिवाजी विठाबाई मारुती गोगावले (रायगड), मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) (बुलढाणा), नितेश निलम नारायण राणे (सिंधुदुर्ग), आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर (अकोला), प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर (कोल्हापूर), आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (गडचिरोली), माधुरी मिरा सतिश मिसाळ (भंडारा) डॉ. पंकज कांचन राजेश भोयर (वर्धा), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (परभणी) तसेच इंद्रनील अनिता मनोहर नाईक (गोंदिया) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालय येथे आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पालकमंत्री अथवा मंत्री अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत तर विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra to hold Independence Day flag hoisting at 9.05 am; Governor in Pune, CM in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात