19 जूनला राहुल गांधी बनले होते “परशुराम”; एक जुलैला अखिलेश बनले “कृष्ण”; पण दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह!!

नाशिक : 19 जूनला राहुल गांधी बनले होते “परशुराम”; एक जुलैला अखिलेश बनले “कृष्ण”; पण दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह!!, हेच राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले. Akhilesh Yadav

– राहुल गांधी “परशुराम”

19 जूनला राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाराणसी मध्ये राहुल गांधींच्या परशुराम रूपातल्या फोटोला गंगास्नान आणि दुग्ध स्नान घातले होते. राहुल गांधी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहेत. ते सनातन धर्मावर प्रेम करतात म्हणून त्यांची परशुराम रुपात पूजा केल्याचा दावा राहुल गांधींच्या समर्थकांनी केला होता. पण राहुल गांधींच्या काँग्रेसच्या सरकारने प्रत्यक्ष भगवान श्रीराम हे काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करून सनातन धर्माचा अपमान केला होता, हे मात्र राजकीय सत्य त्यांचे समर्थक त्यावेळी विसरले होते.

– अखिलेश यादव “श्रीकृष्ण”

पण 19 जूनला वाढदिवसाच्या दिवशी फक्त राहुल गांधीच परशुराम बनून राहिले नाहीत. आज एक जुलैला अखिलेश यादव हे “श्रीकृष्ण” बनले. त्यांच्या आजच्या वाढदिवशी त्यांच्या समर्थकांनी श्रीकृष्ण रुपात अखिलेश यादवांची पूजा केली. अखिलेश यादव यांच्या श्रीकृष्ण रुपातल्या फोटो समोर त्यांच्या समर्थकांनी मोठा यज्ञ केला. मैं पूजा पाठ मे विश्वास नही करता असे अखिलेश यादव म्हणाले होते, पण त्यांच्या वक्तव्याचा त्यांच्या समर्थकांना विसर पडला. अखिलेश यादव यांच्या 53 व्या वाढदिवस त्यांचे समर्थक आणि समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी खुल्या मैदानात 53 पुशअप्स मारून अखिलेशला शुभेच्छा दिल्या.

– दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह

राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी त्याचबरोबर अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांनी जरी त्यांच्या प्रतिमा हिंदू सनातन धर्माच्या प्रतीकांमध्ये पुजल्या असल्या तरी दोन्ही नेत्यांची प्रतिमा सनातन धर्म प्रेमी होणे कठीण आहे. कारण त्यांचा दोघांचाही राजकीय इतिहास आणि वर्तमान सनातन धर्मविरोधीच आहे. राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने कायम मुस्लिम लीगी मानसिकता जपली, तर अखिलेश यादव यांच्या वडिलांनी थेट अयोध्येतल्या कारसेवकांवरच गोळी चालवली होती. या दोन्ही नेत्यांनी आपले राजकारण पुढे रेटताना हिंदू सनातन धर्मीयांमध्ये फूट पडेल आणि इतर धर्मीयांची एकजूट वाढेल यासाठीच “डाव” खेळले. त्यामुळेच दोघांच्याही सनातन प्रेमावरचे ठळक प्रश्नचिन्ह आजही कायम राहिले. मग त्यांच्या समर्थकांनी कितीही परशुराम आणि श्रीकृष्णाचा उदो उदो केला तरी हिंदू सनातन धर्मीय दोन्ही नेत्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Samajwadi Party workers unveiled posters portraying Akhilesh Yadav as Lord Krishna on his birthday.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात