नाशिक : सचिन अहिरांनी शिंदे सैनिक येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबरोबर जाऊन सचिन अहिर यांचा विधान परिषदेच्या उमेदवारी विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय कामगार सेनेचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सर्व संधींसाठी त्यांचे आभार सुद्धा मानले.
– सचिन अहिरांचे उद्धव ठाकरे यांना पत्र
या पत्रातून सचिन अहिर यांनी दोन्ही राजकीय डगरींवर पाय ठेवले. सचिन अहिर यांचा मूळ मतदारसंघ असलेल्या वरळीत सध्या आदित्य ठाकरे आमदार आहेत. त्यांना निवडून आणण्यात सचिन अहिर यांची महत्त्वाची राजकीय भूमिका होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे सचिन अहिर त्यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले होते. सचिन अहिर यांनी वरळीची जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडल्याच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर धाडले, पण सचिन अहिर यांची विधान परिषदेची मुदत 2028 मध्ये संपत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहून ते पुन्हा विधान परिषदेवर निवडून येण्याची शक्यता नसल्याने सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. पण ती वाट धरताना उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कुठलीही राजकीय कटूता ठेवली नाही. उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हाच त्यांचा दोन राजकीय डगरींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न ठरला.
– दोन डगरींवर पाय
आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सोडून गेलेल्या आमदार – खासदारांनी कायम उद्धव ठाकरे यांच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातली उणी दुणी काढली. ठाकरे पिता-पुत्रांना नावे ठेवत ते शिवसेनेच्या बाहेर गेले. पण सचिन अहिर यांनी मात्र दोन राजकीय डगरींवर पाय ठेवत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपला परतीचा दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App