उत्तर प्रदेशात मुसलमान मुख्यमंत्री करण्यासाठी अखिलेश यादवांवर दबाव; जातीय समीकरणांच्या आकड्यांचे फेकले “गौडबंगाल”!!

Muslim Chief Minister

नाशिक : उत्तर प्रदेशात मुसलमान मुख्यमंत्री करण्यासाठी अखिलेश यादवांवर दबाव; जातीय समीकरणांच्या आकड्यांचे फेकले “गौडबंगाल”!!, असे राजकीय चित्र समोर आले.Akhilesh Yadav to appoint a Muslim Chief Minister in Uttar Pradesh;

उत्तर प्रदेशात २०२७ च्या पहिल्या तिमाहीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल नंतर त्याच राज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून विधानसभा निवडणुकीला हिंदुत्ववादी विरुद्ध हिंदू विरोधी अशा लढ्याचे स्वरूप आधीच प्राप्त झालेय. अशातच काही तथाकथित धर्मनिरपेक्ष नेत्यांनी हिंदूंमध्ये जातींच्या आधारे फूट पाडून निवडणूकीची नवीन मांडणी करायचा डाव खेळला.



 

– मौलाना नोमानींचा “डाव”

हिंदू समाज एकजिनसी नाही. जाट, लिंगायत, आदिवासी हे समाज स्वतःला हिंदू मानत नाहीत. त्यामुळे मुळात हिंदू हे आता भारतातले बहुसंख्यांक नागरिक उरलेलेच नाहीत, असा दावा करून मौलाना नोमानी यांनी उत्तर प्रदेशात मुस्लिम + दलित + आदिवासी आणि ओबीसी यांनी बेरजेचे राजकारण करून सत्ता आणली पाहिजे, असे सांगितले.

एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातला संपूर्ण हिंदू समाज आणि विशेषतः महिला एकवटले असताना मौलाना नोमानी यांनी हिंदू समाजात जातीय आधारावर फूट पाडून त्यात मुस्लिमांना जोडून “बीच मे मेरा चांदभाई” या म्हणीचे प्रत्यंतर आणून दिले. यातून त्यांनी हिंदू समाजातल्या जातींना तोडून त्यांच्यावर मुस्लिम समाजाच्या एकजुटीचे वर्चस्व लादायचा “डाव” खेळला.

– शहाबुद्दीन बरेलवींचे अखिलेशला पत्र

पण त्या पलीकडे जाऊन आणखी एक मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहाबुद्दीन बरेलवी यांनी तर थेट उत्तर प्रदेशात मुस्लिम मुख्यमंत्री करण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर दबाव आणला. यासाठी त्यांनी जातीय गणिताचा आधार घेऊन आकड्यांचे “गौडबंगाल” समोर फेकले. उत्तर प्रदेशात म्हणे, 22 % मुस्लिम आहेत. फक्त ७ %यादव आहेत. आतापर्यंत मुस्लिमांनी कायम समाजवादी पार्टीलाच मतदान केले. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीच्या वेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री म्हणून मुस्लिम चेहऱ्याला पुढे आणावे, अशी मागणी करणारे पत्रच मौलाना शहाबुद्दीन बरेलवी यांनी पाठविले.

– आकड्यांचे “गौडबंगाल”

वास्तविक उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या २२ % असल्याचा कुठलाही अधिकृत पुरावा नाही. 2026 ची जनगणना अजून सुरू आहे. त्यामुळे आधीच्या जनगणनेचा अधिकृत आकडा घेतला, तर मुस्लिमांची संख्या तिथे 19 % च्या देखील खाली भरते. पण मौलाना शहाबुद्दीन बरेलवी यांनी मुस्लिमांचा आकडा फुगवून सांगितला, तर यादवांचा आकडा कमी केला.

 

– “मुस्लिम नॅरेटिव्ह”

या सगळ्या प्रकारातून उत्तर प्रदेश मधल्या मुस्लिम धर्मगुरूंची धर्मांध आणि जिहादी मानसिकताच समोर आली. उत्तर प्रदेशात खरे – खोटे आकडे फेकून हिंदू समाजात फूट पाडायची आणि राज्यामध्ये काही ना काहीतरी “खेळ” करून मुस्लिमांचे वर्चस्व प्रस्थापित करायचे, या मानसिकतेतूनच वर उल्लेख केलेल्या दोन धर्मगुरूंनी उत्तर प्रदेश मधल्या निवडणुकीत “मुस्लिम नॅरेटिव्ह” प्रस्थापित करायचा प्रयत्न केला.

Akhilesh Yadav to appoint a Muslim Chief Minister in Uttar Pradesh; a complex web of caste arithmetic figures has been thrown into the mix!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात