नाशिक : सुनेत्रा पवारांचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबरोबर कार्यक्रम, पण क्लेरिकल मिस्टेक मधून दोघांना वगळले राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून!!, असल्या पवार कुटुंबाच्या राजकीय गेमा आज समोर आल्या.
– सुनेत्रा पवारांचे तटकरेंच्या मतदारसंघात कार्यक्रम
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कालच सुनील तटकरे यांच्या रायगड मध्ये जाऊन त्यांच्याबरोबर कार्यक्रम घेतला. त्यांनी अनेक विकास कार्यक्रमांची भूमिपूजने आणि उद्घाटने केली. त्या कार्यक्रमातून सुनेत्र पवारांनी आदिती तटकरे आपल्याला मुलीसारखी आहे, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर अजित पवारांचे सुनील तटकरे यांच्याशी जसे संबंध होते, तसेच ते संबंध यापुढे कायम राहतील, असे सुद्धा सांगितले. रोहित पवार आणि बाकीचे नेते सुनील तटकरे यांना “टार्गेट” करत असताना सुनेत्रा पवारांनी रायगड मध्ये जाऊन तटकरे कुटुंबीयांबरोबरचा आपला राजकीय बंध कायम ठेवला. सुनील तटकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी म्हणून सुनेत्रा पवारांचा गौरव केला. सुनेत्रा पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले.
– पटेल, तटकरे यांना वगळायची क्लेरिकल मिस्टेक
पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीच नावे वगळल्याचे एका यादीमुळे समोर आले. मात्र ही “क्लेरिकल मिस्टेक” असल्याचे सुनेत्रा पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केले. ही “क्लेरिकल मिस्टेक” लवकरच दूर करण्याचे आश्वासन त्यांनी ट्विटर वरूनच दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत त्यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे समाविष्ट केली.
📍रायगड रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. रोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि नवी सुरुवात आहे. या विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद… pic.twitter.com/LaktJcEPrh — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026
📍रायगड
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. रोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि नवी सुरुवात आहे. या विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद… pic.twitter.com/LaktJcEPrh
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026
– सुनेत्रा पवार पटेलांबरोबर गुवाहाटीत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राजकीय वाद उफाळून आला असतानाच सुनेत्रा पवार या गुवाहाटी मध्ये जाऊन हेमंत विश्वशर्मा यांच्या शपथविधी समारंभात सहभागी झाल्या. यावेळी त्यांच्या समवेत प्रफुल्ल पटेल हे देखील शपथविधीच्या स्टेजवर हजर होते. त्याआधी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकत्र जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सुनेत्रा पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले.
– पटेल, तटकरे यांना हात लावायची हिंमत नाही
याचाच अर्थ पवार कुटुंबीयांच्या राजकीय गेमाच यातून बाहेर आल्या. सुनेत्रा पवार यांनी काल आणि आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला, पण त्यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळण्याच्या घटनेला मात्र “क्लेरिकल मिस्टेक” असे नाव दिले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुद्धा कुटुंबीयांनी केलेल्या राजकीय गेमा सहन केल्या. पण ते पवार कुटुंबीयांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादीतून बाजूला झाले नाहीत. पवार कुटुंबीयांना सुद्धा वरवरच्या राजकीय गेमा खेळण्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीतून बाजूला काढता आले नाही.
– गेमांवर घालावे लागले पांघरूण
एरवी शरद पवार जर खऱ्या अर्थाने राजकीयदृष्ट्या प्रबळ उरले असते, तर त्यांनी एकाच राजकीय खेळीच्या झटक्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून दूर सारले असते. पण शरद पवार आणि त्यांचे चेले आणि पवार कुटुंबीय देखील तसे करू शकले नाहीत. कारण भाजपचे नेतृत्व सध्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना हात लावायची पवार कुटुंबीयांची हिंमत होऊ शकली नाही. म्हणूनच सुनेत्रा पवारांना “क्लेरिकल मिस्टेक” वगैरे भाषा वापरून पवार कुटुंबियांच्या राजकीय गेमांवर पांघरूण घालावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App