नाशिक : इराणनेच पडला पाकिस्तानी मध्यस्थीचा बुरखा; इराणी परराष्ट्रमंत्री मदत मागण्यासाठी गेले रशियाला!!, ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आज समोर आली.
अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धात फार मोठा शांती दूत म्हणून पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा बुरखा पांघरला होता. त्या पाकिस्तानला सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा सुद्धा दिला होता. पाकिस्तानने भरपूर खर्च करून अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळाची चर्चा पाकिस्तानातल्या अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये घडवून आणली होती. पण ती चर्चा 21 तास चालल्यानंतर सुद्धा फिस्कटली. अमेरिका आणि इराण यांची शिष्टमंडळे हात हलवत पाकिस्तानातून निघून गेली होती. पण ज्या हॉटेलमध्ये ही चर्चा झाली, त्या हॉटेलचे बिल सुद्धा पाकिस्तानी सरकार भरू शकले नाही. पाकिस्तानचा सुरक्षा खर्च सुद्धा वाया गेला.
त्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघाची एकदाच इस्लामाबादला आले पण अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबादला आलेच नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबाद दौरा रद्द केला. त्यानंतर अराघाची इस्लामाबाद मधील निघून गेले.
– इराणने फाडला पाकिस्तानी मध्यस्थीचा बुरखा
याच दरम्यान इराणने पाकिस्तानचा मध्यस्थीचा बुरखा फाडला. पाकिस्तानी अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात पाकिस्तानचे नेते अमेरिकेच्या बाजूने झुकले. त्यांनी अमेरिकेचीच तळी उचलून धरली. मध्यस्थी करणारा देश हा तटस्थ असावा पण पाकिस्तान तटस्थ राहिला नाही. त्यामुळे तो मध्यस्थी करण्याच्या लायकीचा देश उरला नाही, अशा शब्दांमध्ये इराणी संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेझई यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले.
– इराणी परराष्ट्र मंत्री पासपोर्ट
याच दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघाची यांनी इस्लामाबाद सोडून मॉस्को गाठले. त्यांनी रशियाकडे मदतीची मागणी केली. त्यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. ज्या रशियाला अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धापासून सगळ्याच बाबतीत लांब ठेवू इच्छित होती, इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी त्याच रशियाची मदत मागितली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडले आणि त्यांनी इराणच्या तेलाच्या पाईपलाईन्स फोडायची धमकी दिली.
– पाकिस्तानची नाचक्की
पण या सगळ्यांमध्ये पाकिस्तानची जबरदस्त नाचक्की झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुरुवातीलाच पाकिस्तान मध्यस्थ देश नाही, तर दलाल देश आहे, असे शरसंधान साधले होतेच. तेच इराणी संसदेच्या सुरक्षा प्रवक्त्याने सिद्ध केले. पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून प्रतिष्ठा मिळाली नाही, त्या उलट इराण सारख्या मित्र देशाकडूनही दुषणे मिळाली. पाकिस्तानला मध्यस्थीचा आर्थिक लाभ मिळणे तर सोडाच, हॉटेलची बिले भागवताना सुद्धा दमछाक झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App