नाशिक : अरविंद केजरीवालांची दारू घोटाळ्यातून निर्दोष सुटका आणि त्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी केलेली राडाराड थांबायच्या आत सीबीआय दिल्ली हायकोर्टात!!, अशी घडामोड आज घडली. Kejriwal
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांची राऊज एवेन्यू कोर्टाने दारू घोटाळ्यातून निर्दोष सुटका केली. ही सुटका करताना कोर्टाने केजरीवाल सिसोदिया आणि अन्य पाच जणांविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे दिले नसल्याबद्दल सीबीआयला झापले. आरोपपत्रांच्या कागदपत्रांचे गठ्ठे म्हणजे पुरावे होऊ शकत नाहीत. नुसते गंभीर आरोप केल्याने, ते आरोप सिद्ध होत नाहीत, अशा शब्दांचे ताशेरे राऊज अवेन्यू कोर्टाने सीबीआय वर ओढले. त्याचवेळी कोर्टाने दारू घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटल चौकशीची शिफारस केली.
– अरविंद केजरीवाल रडले
हे सगळे घडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना डोळ्यातून अश्रू काढले. त्यांनी मनीष सिसोदी यांना मिठी. मारली मनीष सिसोदियाही थोडे रडले. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे ढसाढसा रडले, अशा बातम्या सर्व माध्यमांनी दिल्या. अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांसमोर अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवावी. सत्तेचा वापर जनसामान्यांसाठी करावा. पण, आमच्यासारख्या प्रामाणिक लोकांना संपवण्यासाठी करू नये. मी आयुष्यभर पैसा कमावला नाही, फक्त प्रामाणिकपणा कमावला, असे केजरीवाल यांनी सांगितले.
– सीबीआय दिल्ली हायकोर्टात
पण अरविंद केजरीवाल यांचे हे रडणे थांबायच्या आत सीबीआयने राऊज अवेन्यू कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीबीआयच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज देखील केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे ढसाढसा रडणे आणि सरकारवर आरोप करणे याचे सगळे मुसळ केरात गेले. सीबीआय आणि अरविंद केजरीवाल या दोघांनाही आता दिल्ली हायकोर्टात दारू घोटाळ्यासंदर्भातली केस पहिल्यापासून लढावी लागणार असून तिचा निकाल लागायला आणखी काही वर्षे लागतील. त्यामुळे दारू घोटाळ्यातून झालेली सुटका ही अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी साठी औट घटकेची ठरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App