विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bacchu Kadu शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी थेट विखे पाटील यांच्या गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.Bacchu Kadu
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांकडून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांविरोधात बेताल वक्तव्यांची मालिका सुरू आहे. या यादीत आता राधाकृष्ण विखे पाटील यांचे नावही समाविष्ट झाले आहे. आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यांच्या विधानावर शेतकऱ्यांसह विरोधकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपरोक्त घोषणा केली.Bacchu Kadu
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय. नाव राधाकृष्ण आणि कृत्य मात्र कंसाचे, अशी टीका त्यांनी केली. शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही. त्यामुळे ही नालायकी थांबवा, असेही ते म्हणाले. एकीकडे फडवणीस साहेब कर्जमाफीची घोषणा करतात. तर दुसरीकडे हे वाचाळवीर मंत्री आहे जे असे वक्तव्य करतात. अशी अवलाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हाकलून लावली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्या बक्षीस देण्याची घोषणा केली. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला माझ्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच मला जर त्यांची गाडी दिसली, तर मी स्वतः ती फोडणार, असा इशाराही त्यांनी दिला.
आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापा
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीवरून प्रहारचे अध्यक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी परिषदेत शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली होती. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल, पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असे बच्चू कडू म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App