Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.Rahul Gandhi’s foreign visits cast doubt

राहुल गांधींनी गेल्या सहा महिन्यांमध्ये नऊ परदेश दौरे केल्याचे बोलले गेले. त्याचवेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणांना वेळेआधी माहिती दिली नसल्याचेही समोर आले कारण सुरक्षा यंत्रणांनी तसेच पत्रच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविले. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी त्या पत्राच्या टायमिंग वर संशय व्यक्त केला. पण राहुल गांधींच्या सुरक्षेविषयी त्यांनी फारशी काळजी दाखविली नाही.



– म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे

राहुल गांधी वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांवर गेले. त्यामध्ये त्यांचा म्यानमारचा गुप्त दौरा जास्त संशयास्पद ठरला. कारण मतदान चोरी संदर्भात त्यांनी महादेवपुराचा जो संदर्भ घेतला, त्याचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले. त्यांच्या पत्रकार परिषद घेतली पीडीएफ फाईल म्यानमार मधून डाउनलोड झाल्याचे दिसून आले. खुरपेंच डिजिटल मीडियाने याविषयीची तपासणी केल्यावर म्यानमारचे कनेक्शन आढळले. त्यामुळे राहुल गांधींनी मतदान चोरीचे आरोप केल्यानंतर त्यांच्याभोवती जमा झालेले सगळे लिबरल लोक सुरुवातीला गप्प झाले.

पण त्यानंतर काही लोकांनी त्या डिजिटल पुराव्यांना देखील नाकारायला सुरुवात केली. पीडीएफ फाईल मधला डेटा त्याचे टाइमिंग, त्याचे सेव्ह होण्याचे आणि डाऊनलोड होण्याचे टाइमिंग याविषयी संशय व्यक्त करून राहुल गांधीच बरोबर असल्याचा दावा केला. पण या दाव्यासाठी त्यांनी नवे कुठलेही पुरावे सादर केले नाहीत.

Vote theft allegations: Digital threads in Myanmar; Rahul Gandhi’s foreign visits cast doubt!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात