वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळ मधल्या कम्युनिस्टांना केवळ हिंदू किंवा अन्य कुठल्या धर्माबद्दल द्वेष उरलेला नसून तो आता भारतमातेच्या तसबिरीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारतमातेची तसबीर, पुतळा किंवा मूर्ती सरकारी कार्यक्रमांमध्ये नको अशी भूमिका केरळ मधल्या कम्युनिस्टांच्या सरकारने घेऊन ती राज्यपालांवर लादायचा प्रयत्न केला मात्र राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कम्युनिस्टांचा हा प्रयत्न उधळून लावला.
केरळ मधल्या राजभवनात पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेजवर भारतमातेची तसबीर ठेवली होती. तिच्यासमोर समई ठेवली होती. पाहुण्यांना ती प्रज्वलित करायचे काम होते. त्यानुसार राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी ही समय प्रज्वलित केली, पण केरळच्या पर्यावरण मंत्र्यांनी तसे करणे नाकारले. ते कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले.
कुठल्याही सरकारी कार्यक्रमात भारतमातेची तसबीर नको. कारण की तसबीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात वापरण्यात येते त्यामुळे सरकारी कार्यक्रमांमध्ये भारत मातेची तसबीर नकोच अशी भूमिका केरळच्या पर्यावरण मंत्र्यांनी जाहीरपणे घेतली. त्यामुळे केरळमध्ये मोठा वाद पेटला राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी भारतमातेच्या तसबिरी वरून अकारण वाद उत्पन्न करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. भारतमाता सगळ्या वादांच्या पलीकडे असताना त्यावर अकारण वाद उकरून काढणे सरकारला शोभत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
त्यानंतर आज कम्युनिस्टांची विद्यार्थी संघटना डेमोक्रेटिक युथ फेडरेशनने (DYFI) राजभवनावर मोर्चा आणला. केरळ मधल्या सरकारी कार्यक्रमांमध्ये कुठेही भारत मातेची तसबीर पुतळा किंवा मूर्ती लावू देणार नाही, अशी दमबाजी मोर्चेकर्यांनी केली. राज्यपालांनी या दमबाजीला भीक घातली नाही.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: DYFI (Democratic Youth Federation of India) stages a protest march to Kerala Rajbhavan over the use of Bharat Mata portrait in official programmes. pic.twitter.com/LWOT9769HW — ANI (@ANI) June 19, 2025
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: DYFI (Democratic Youth Federation of India) stages a protest march to Kerala Rajbhavan over the use of Bharat Mata portrait in official programmes. pic.twitter.com/LWOT9769HW
— ANI (@ANI) June 19, 2025
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App