Eknath Shinde : ‘’निलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या’’

Eknath Shinde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde  अंधेरी विभागातील शेर ए पंजाब नगर येथील बीएमसी मैदान येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोगत मांडताना विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीला भक्कम साथ देण्याचे आवाहन लाडक्या बहिणींना केले.Eknath Shinde

यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार चित्रा वाघ, आमदार मुरजी पटेल, माजी नगरसेवक कमलेश राय, जितेंद्र जनावळे, माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेविका चंद्रावती मोरे, उपनेत्या कला शिंदे, केसरबेन पटेल, विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, अनिल खांडेकर तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि अंधेरी विभागातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ.निलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबले. निलम ताईंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या. डॉ.निलम गोऱ्हे यांच्यापुर्वीही अनेक लोक याबाबत बोलले आहेत. राज ठाकरे बोलले की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र डॉ.निलम गोऱ्हे बोलल्या, तर लगेचच त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे तुम्हाला शोभत नाही. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे.

Eknath Shinde targets Thackeray group over criticism of Neelam Gorhe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात