विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात उद्रेक पसरवणारी व्यक्ती कोण आहे सगळ्यांना माहित आहे. कोण तो जाणता राजा आहे जो मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राम कदम यांनी केली. Ram Kadam criticizes Sharad Pawar
मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या गटांना भांडवत ठेवायची त्यांची आजपर्यंत खेळी राहिली आहे. शरद पवार सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला का आले नाही ? त्यांना जर मत व्यक्त करायचं होतं तर मग बैठकीला यायला हवं होतं. केवळ विधानसभा निवडणुकीसाठी काही मुद्दे पेटते ठेवायचे आहेत, हा त्यांचा उदेश आहे निवडणूकीत उपयोग होईल अशा दंगली सुरु ठेवायच्या आहेत.
कदम. म्हणाले, बदलापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्रमध्ये नाही तर देशभरात वेदना झाल्या आहेत. अशा गुन्हेगारांना दगडाने ठेचण्याची गरजेचं आहे. पण कायद्याची बंधने आहेत. कायदा हातात घेता येतं नाही. त्याला फाशीवर चढवलं जाईल. पण विरोधकांनी या विषयात घाणेरडं राजकरण करू नये.
ADR report : ADRचा अहवाल- देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप; राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या खासदार-आमदारांविरुद्ध सर्वाधिक खटले
मुंगेरीलाल के हसीन सपने अशी काँग्रेसची अवस्था आहे. मालिका यायची आधीजो पक्ष सत्तेत येणार नाही ते असं स्वप्न पाहत आहेत . काँग्रेस देशहित कधीच बघत नाही. राहुल गांधी यांची विधान पाहा, जातींमध्ये समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहेत , अशी टीका कदम यांनी केली.
देवेंद्र फडणवीस देवमाणूस आहेत. ते रस्त्यावर उतरून कामं करणारे आहेत. पण वाझेला वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App