झारखंड निवडणुकीपूर्वी घेतला मोठा निर्णय
विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन Champai Soren यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
चंपाई सोरेन यांनी ट्विट केले तेव्हा ते दिल्लीत होते. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे मानले जात होते. एवढेच नाही तर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनीही एक ट्विट केले आहे. ज्यात ते चंपाई सोरेन यांना उद्देशून म्हणाले होते, एनडीए परिवारात टायगरचे स्वागत आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांची पक्षावरील नाराजी मागील काही दिवसांपासून दिसती होती. मात्र आता त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणाही केली आहे. राजकारणातून संन्यास घेणार नसून नवीन पक्ष काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच चंपाई सोरेन यांनीही युतीचे दरवाजे खुले ठेवले आहेत. ते म्हणाले की मी तीन पर्याय दिले होते – निवृत्ती, संघटना किंवा मित्र. चंपाई सोरेन म्हणाले, मी निवृत्त होणार नाही. मी पक्ष मजबूत करेन, नवा पक्ष काढेन. मला वाटेत एखादा चांगला मित्र भेटला तर मी त्याच्यासोबत पुढे जाईन.
हेमंत सोरेन Champai Soren यांनी जानेवारीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मात्र हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा 3 जुलै रोजी चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांची नाराजी वाढू लागली. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना त्यांची बंडखोर वृत्ती दिसून आली. तीन दिवसांपूर्वी ते दिल्लीत पोहोचल्यानंतर ते भाजपमध्ये जातील अशी शक्यता बळावली होती, मात्र त्यांनी तसे न करता आता नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांनी अद्याप पक्षाचे नाव जाहीर केलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App