अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे Andhra Pradesh
विशेष प्रतिनिधी
अनकापल्ले : आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या स्फोटात 40 जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युतापुरम स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मध्ये असलेल्या Ascientia Advanced Sciences Private Limited मध्ये बुधवारी दुपारी 2:15 च्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. दीपिका यांनी सांगितले की, “सध्या मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 40 जण जखमी झाले आहेत, बचावकार्य सुरू आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App