इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले!

The helicopter carrying the president of Iran crashed

‘हार्ड लँडिंग’ करावे लागले, अझरबैजानमध्ये झाला अपघात The helicopter carrying the president of Iran crashed

विशेष प्रतिनिधी

तेहरान : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला, त्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने ही माहिती दिली.

रायसी यांच्यासोबत देशाचे अर्थमंत्रीही हेलिकॉप्टरमध्ये होते. पूर्व अझरबैजान भागात हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आले असून एक बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. धुके आणि खराब हवामान हे अपघाताचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी काही स्थानिक माध्यमे देखील हेलिकॉप्टरशी अद्याप संपर्क झाला नसल्याचं वृत्त देत आहेत.

तेहरान टाईम्सच्या मते, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यापैकी दोन सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले, परंतु एकाचा अपघात झाला. इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ ही घटना घडल्याचे स्टेट टीव्हीने म्हटले आहे.

The helicopter carrying the president of Iran crashed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात