लोणावळ्यातील हिलस्टेशनमध्ये पॉर्न व्हिडिओचे शूटिंग, पोलिसांनी 13 जणांना अटक केली

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच मुलींचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले Shooting of porn video in hill station in Lonavala police arrested 13 people

विशेष प्रतिनिधी

लोणावळा  : लोणावळा हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण याच लोणावळ्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळ्यातील एका बंगल्यात अश्लिल व्हिडिओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. यामुळे लोणावळ्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून एका बंगल्यात हे रॅकेट सुरू होते. भारतातील विविध राज्यातील काही तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते आणि ‘नको ते उद्योग’ करत ‘अश्लील’ व्हिडिओ शूट करत होते. खरंतर पॉर्न व्हिडिओ बनवणे भारतात गुन्हा आहे. अश्लील व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे.

अशी माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरलेला कॅमेरा आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. याशिवाय त्याचे काही व्हिडिओही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील एका बंगल्यात विविध राज्यातील काही तरुण जमले होते. हे सर्वजण या बंगल्यात अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अश्लील व्हिडिओ बनवत होते. पॉर्न व्हिडिओ बनवणे भारतात गुन्हा आहे. अश्लील व्हिडिओंवर बंदी आहे. हे माहीत असूनही 15 तरुणांची ही टोळी बंगल्यात अश्लील व्हिडिओ बनवत होती.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच मुलींचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेले सर्व लोक भारतातील विविध राज्यातील आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून १३ जणांना बेड्या ठोकल्या. या सर्व आरोपींविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.

Shooting of porn video in hill station in Lonavala police arrested 13 people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात