दंड, व्याजासह 1700 कोटी रुपये भरा; इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काँग्रेसला नोटीस!!; पण नोटीस पाठवण्यात काही बेकायदा घडलंय का??


नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला दंड आणि व्याजासह 1700 कोटी रुपये भरा अशी नोटीस पाठवली आहे, पण ही नोटीस पाठवण्यात काही बेकायदा घडले का??, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आकारलेला दंड आणि व्याज अतिरिक्त आहे का??, 1700 कोटी रुपयांच्या रकमेची वसुली करणे चुकले आहे का??, त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कमी रक्कम वसूल करायला पाहिजे का??, असे सवाल तयार झाले आहेत. Income Tax Department notice to Congress

काँग्रेस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे भांडण जुने म्हणजे 2017 पासूनचे आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसवर लावलेला इन्कम टॅक्स अन्याय्य असल्याचा दावा करत काँग्रेसने दिल्ली हायकोर्टाचे दार ठोठावले होते. परंतु, हायकोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळत त्यांना कायदेशीर पातळीवर दिलासा द्यायला नकार दिला. हा मामला 210 कोटी रुपयांचा होता.

आता दिल्ली हायकोर्टानेच काँग्रेसला कायदेशीर दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसचा सगळा जुना हिशेब बाहेर काढला. त्यामध्ये दंड आणि व्याजाची रक्कम मिसळली आणि ती रक्कम 1700 कोटी रुपये भरली. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काँग्रेसला 1700 कोटी रुपये वसुलीची नोटीस पाठवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने काँग्रेस कंगाल होणार, अशी मखलाशी काँग्रेस मधून आणि काँग्रेस समर्थकांकडून सुरू झाली आहे, पण यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोणती कायदेशीर चूक केली आहे का?? त्यांनी नमूद केलेली 1700 कोटी रुपयांची रक्कम आज जरी खूप मोठी वाटत असली, तरी तिच्यात कोणती कायदेशीर त्रुटी आहे का??, ती रक्कम आकारताना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची बेरीज – वजाबाकी – गुणाकार – भागाकार काही चुकले आहे का??, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दंड आणि व्याजदर अतिरिक्त लावला आहे का?? या सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मात्र काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थक तयार नाहीत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची तिजोरी पूर्ण खाली झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना रेल्वेचे तिकीट काढून प्रचाराला जाणे सुद्धा पैसे उरलेले नाहीत असा दावा केला होता. मोदी सरकार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सारख्या प्रमुख विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पण त्याचवेळी दिल्ली हायकोर्टाकडून काँग्रेसला नकाराचा फटका बसला. त्यानंतर आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सगळा जुना हिशेब काढून त्यामध्ये दंड आणि व्याज मिसळून 1700 कोटी रुपये काँग्रेसकडून येण्याची बाकी काढली. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे काय चुकले??, आकडेवारी चुकली का?? या प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी काँग्रेसने त्यांनी दिलेली नाहीत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने 1700 कोटी रुपयांची वसुली करण्याची नोटीस 2017 – 18 आणि 2020 – 2021 या आर्थिक वर्षांमधली आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2017 ते 2021 या 4 वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी केली. त्याविरोधात काँग्रेसने हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण ती हायकोर्टाने फेटाळली. त्याआधी 2014-15 ते 2016-17 या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. पण काँग्रेसने ती रक्कम भरली नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसची बँक खाती गोठवली. मात्र या कारवाईचा चाप लागताच त्यावेळी काँग्रेसने लगेच एकाच वेळी 150 कोटी रुपये भरले होते.

पण आता तब्बल 1700 कोटींची नोटीस आल्याने काँग्रेससमोर मोठे संकट उभे ठाकले. हायकोर्टानेही दिलासा न दिल्याने निवडणुकीतच पक्षाची कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच इतर पक्षाच्या इतर कामांसाठी पैसेच नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला होता. बँक खाती गोठवल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ शकत नाही, असे नेत्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता पुन्हा नोटीस आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हे सगळे राजकीय रडगाणे झाले, पण मूळात काँग्रेसने आर्थिक शिस्त पाळून वेळोवेळी इन्कम टॅक्स भरला का??, तो पुरेसा ठरला का??, त्याचा हिशेब ठेवून तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर केला का?? किंवा तो हायकोर्टात सादर करून हायकोर्टाकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घेतले का??, हे सर्वांत कळीचे सवाल आहेत. त्याच्या खऱ्या उत्तरांमध्ये काँग्रेसचा प्रामाणिकपणा अथवा अप्रामाणिकपणा दडला आहे. ती उत्तरे काँग्रेसने दिली की, पक्षाच्या व्यवहारातला पारदर्शकपणा उघड्यावर येणार आहे. मग काँग्रेसचे नेते हा पारदर्शक व्यवहार करतील की फक्त राजकीय रडगाणे गात राहतील??, आणि त्यांनी तसे रडगाणे गायले, तर मोदी सरकार जास्तीत जास्त “विसंवादी सूर” लावून काँग्रेसच्या राजकीय रडगाण्याला कशी साथ देईल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Income Tax Department notice to Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात