बनारस हिंदू विद्यापीठात इफ्तार पार्टी चालते पण होळी नाही चालत!

वृत्तसंस्था

बनारस: जिथे रोजा इफ्तार पार्टी जल्लोषत साजरी केली. तिथेच जेव्हा हिंदू आपला सण साजरा करण्याचा आग्रह धरतात, तेव्हा मात्र त्यासाठी परवानगी साफ नाकारली जाते. बनारस हिंदू विद्यापीठच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना कॅम्पस मध्ये होळी खेळण्यास बंदी घातली आहे. कॅम्पसमध्ये होळी खेळून, जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल.असे आदेश युनिव्हर्सिटीने काढले.Banar Hindu University holds Iftar party but not Holi!

गुरुवार 2 मार्च 2023 BHU कॅम्पस मध्ये सर्वत्र हा निर्णय नाकारत होळी खेळण्यात आली.यादरम्यान BHU प्रशासनाच्या परिसरात होळी न खेळण्याच्या सूचने विरोधात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. मधुवन पासून ते कलाविद्या शाखेपर्यंत सर्वांच्या अंगावर होळीच्या आनंदाची रंगत दिसून येत होती. विद्यार्थ्याने व्हीज्यूअल आर्ट्स फॅकल्टीजवळील पाण्याच्या टप मध्ये उतरून होळी खेळली. दुसरीकडे मधुबन मध्ये विद्यार्थ्यांनी कपडे काढून होळी केली. काहींच्या शर्ट फाटला तर काहींचा कुर्ता. यावेळी कॅम्पस मध्ये डीजे वाजत राहिला आणि विद्यार्थ्यांनी चित्रपटातील, भोजपुरी गाण्यांवर नृत्य केले. मुख्य रेक्टर अभिमन्यू सिंग यांच्या नावाने लागू करण्यात आलेल्या या आदेशात विद्यापीठ परिसरात एकत्र येऊन होळी खेळणे, गुंडगिरी करणे, संगीत वाजवणे याला पूर्णपणे मनाई असल्याचे म्हटले आहे. असे करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करेल.

विद्यापीठाचा हा आदेश लागू झाल्यानंतर सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सोशियल मीडियावर BHU प्रशासन ट्रॉल होतंय. सम्राट भाई नावाच्या युजरने लिहिले की “बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर जैन, जे रमजान मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.,त्यांनी कॅम्पस मध्ये होळी खेळण्यावर बंदी घातली आहे. लाज वाटते कुलगुरू!” हे करण्यापेक्षा विद्यापीठाने सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे होळी हा रंगांचा सण थाटामाटात साजरा करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आदेशाला विरोध करत केले आहे.

इफ्तार पार्टीसाठी BHU प्रशासनाने यावर उत्तरा दाखल म्हटले. विद्यापीठात अनेक वर्षापासून रोजा इफ्तार चे आयोजन केले जात, असून कुलगुरू हे विद्यापीठ परिवाराचे प्रमुख असल्याने त्यात सहभागी होत आहेत. पण जेव्हा होळी साजरी करण्याचा मुद्दा विद्यापीठाकडून परवानगी सर्रास नाकारली जाते. मग याला धर्मभेद म्हणावे का? जिथे आपण शिकतो तिथेच जर का हा भेद दर्शवला जाणार असेल. विद्यार्थ्यांच्या मनात इतर धर्मांच्या बद्दल मतभेद तयार करण्यात येत असतील.,तर मग इतर ठिकाणाहून धर्मनिरपेक्षतेची अपेक्षा करावी का?

Banaras Hindu University holds Iftar party but not Holi!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात