वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी राजौरी येथील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.Jammu Kashmir A major Uri-like terrorist attack attempt foiled in Kashmir, 2 terrorists who stormed into an army camp were killed, 3 jawans were martyred.
राजौरी के दारहाल इलाके के परगल में सेना के कैंप फेंस को किसी ने पार करने की कोशिश की। इस दौरान दोनों तरफ से गोलियां चलीं। दारहल थाने से 6 किमी दूर तक अतिरिक्त दल भेजे गए। 2 आतंकवादी मारे गए और सेना के 2 जवान घायल हुए हैं: मुकेश सिंह, ADGP, जम्मू, जम्मू-कश्मीर — ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2022
राजौरी के दारहाल इलाके के परगल में सेना के कैंप फेंस को किसी ने पार करने की कोशिश की। इस दौरान दोनों तरफ से गोलियां चलीं। दारहल थाने से 6 किमी दूर तक अतिरिक्त दल भेजे गए। 2 आतंकवादी मारे गए और सेना के 2 जवान घायल हुए हैं: मुकेश सिंह, ADGP, जम्मू, जम्मू-कश्मीर
— ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2022
लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.
तत्पूर्वी, जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “कोणीतरी राजौरीतील परगल, दारहाल भागात असलेल्या आर्मी कॅम्पचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.
स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवून सोडण्यासाठी कोणतीही मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना सातत्याने करत असतात. गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत. राजौरी येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App