पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घसून नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यातील वाकड परिसरात घडला आहे. पिडिता मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वाकड परिसरात उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात पुन्हा आता महिला सुरषेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.To drink water reason youth come to one house in wakad area and raped the १७th years girl
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला. पिडीत मुलगी ही घरी एकटी होती. यावेळी एक २५ ते २८ वर्षवयोगाततील आरोपी मुलीच्या घरात पाणी पिण्याच्या उद्देशाने शिरला. यावेळी त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी फरार झाला.
भितीपोटी मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र, ती गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले. यावेळी तिने सर्व घडलेली हकिगत सांगितली. यानंतर पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात जात आरोपी विरु द्ध तक्रार दिली. पोलिसांनी बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App