महिला अत्याचाराच्या ‘या’ घटनांनी हादरला महाराष्ट्र, आक्रमक विरोधकांची ठाकरे-पवार सरकारवर सडकून टीका, वाचा सविस्तर…

Rape Cases In Maharashtra Increased Opposition Slams CM Uddhav Thackeray Govt

Rape Cases In Maharashtra Increased : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांची दखल घेत तत्काळ अधिवेशन बोलवण्यास सांगितले. यावर मुख्यमंती उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून राज्यपालांना इतर राज्यांतील गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली. तथापि, या प्रकारामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपीडित महिलांच्या वेदनांची थट्टा उडवणे असल्याचा आरोप करत विरोधकांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्याचे पत्र जाळतं जाहीर निषेध केला आहे. Rape Cases In Maharashtra Increased Opposition Slams CM Uddhav Thackeray Govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांची दखल घेत तत्काळ अधिवेशन बोलवण्यास सांगितले. यावर मुख्यमंती उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून राज्यपालांना इतर राज्यांतील गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली. तथापि, या प्रकारामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपीडित महिलांच्या वेदनांची थट्टा उडवणे असल्याचा आरोप करत विरोधकांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्याचे पत्र जाळतं जाहीर निषेध केला आहे.

अलीकडच्या काळात महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटना! वाचा…

31 ऑगस्ट 2021 : पुण्यात अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार

पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता. दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

6 सप्टेंबर 2021 : नाशिकमध्ये महिलेवर कारमध्ये बलात्कार, तक्रार दाखल

सिन्नर तालुक्यातल्या शहा शिवारात सोमवारी (6 सप्टेंबर) पीडित महिला दुचाकीवरून जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने तिचा कारने पाठलाग सुरू केला. शेवटी त्याने महिलेला गाठले. महिलेच्या दुचाकीसमोर कार लावून अडवले. महिलेला बळजबरने आपल्या कारमध्ये टाकून दरवाजे बंद केले. महिलेने प्रतिकार आणि आरडाओरडा केला. मात्र, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. सोबतच महिलेचे मोबाइलमध्ये फोटो काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम 376, 341, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत.

7 सप्टेंबर 2021 : वसईत अल्पवयीन मतिमंद मुलीवर अतिप्रसंग

वसईत 16 वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अतिप्रसंग झाला आहे. वासनांध आरोपीने राहत्या घराच्या परिसरातून मुलीला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून, अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 11 या वेळेत वालीव पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली असून दोन दिवसानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघड झाली आहे.

9 सप्टेंबर 2021 : मुंबईतील साकीनाकाच्या निर्भयाचा अत्याचारानंतर उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने अवघा देश पुन्हा एकदा हादरून गेला. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

10 सप्टेंबर 2021 : ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

ठाण्यातील उल्हासनगरात एका 14 वर्षीय मुलीवर एका व्यक्तीने रेल्वे परिसरात बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रविवारी (12 सप्टेंबर) ही माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, ते म्हणाले, 35 वर्षीय आरोपीला रविवारी अटक करण्यात आली. ही मुलगी आपल्या मित्रांसोबत उल्हासनगर रेल्वे स्थानकावर स्कायवॉकवर शिर्डीहून घरी परतत असताना आरोपीने तिला जवळच्या रेल्वे क्वार्टरमधील एका निर्जन खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.

11 सप्टेंबर 2021 : पिंपरीत पोलीस असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार

पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

11 सप्टेंबर 2021 : अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बदनामीच्या भीतीने पीडितेची आत्महत्या

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती राहिली. मा६ बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

12 सप्टेंबर 2021 : अमरावतीत 7 वर्षीय चिमुकलीवर 20 वर्षीय युवकाचा बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्या अंतर्गत अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित चिमुकली ही आपल्या मैत्रिणीसोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. यावेळी गावातील वीस वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं. आरोपीने चिमुकलीला स्वतःच्या शेतात नेलं आणि तिथं तिच्याशी बळजबरी केली, तसंच नको त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन नराधम युवका विरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

12 सप्टेंबर 2021 : परभणीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडितेची आत्महत्या

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात राहणाऱ्या पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पीडितेचे वय 16 वर्षे होते. हे तिन्ही आरोपी पीडितेला मागच्या दोन वर्षांपासून त्रास देत होते. 12 सप्टेंबर रोजी संधी साधून या तिन्ही नराधमांनी पीडित मुलीला दिघोळ तांडा परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने विष प्राशन केले. तिला अंबाजोगाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी पीडितेला लातूरच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. पीडितेचा लातूर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

12 सप्टेंबर 2021 : पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

13 सप्टेंबर 2021 : उल्हासनगरात 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उल्हासनगरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका मामाने आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या नराधम मामाला अटक केली आहे.

14 सप्टेंबर 2021 : जालन्यात 65 वर्षांच्या नराधमाचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार

महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षांच्या मुलीवर गावातील वृद्धाने कथित बलात्कार केला. 65 वर्षीय आरोपीला पाच मुले आणि नातवंडे आहेत. त्यानंतर मंगळवारी (14 सप्टेंबर) रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.

21 सप्टेंबर 2021 : भिवंडीत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलीची मान दुखत होती. यावर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुद्धा करण्यात आले मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर त्यांच्या एक ओळखीच्या व्यक्तीसोबत पीडित मुलीची आई तिला घेऊन एका भोंदूबाबाकडे गेले. पीडित मुलीच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. यावरुन भोंदूबाबाने दावा केला की, पीडित मुलीच्या अंगात काकाची भूत आहे आणि ते भूत बाहेर काढावे लागेल. नंतर या भोंदूबाबाने पीडित मुलीला जवळील जंगलात नेते आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा याच्यासह पीडित मुलीची आई आणि त्यांच्या परिचयाचा एक व्यक्ती अशा तिघांना अटक केली आहे.

 

(टिप : विविध माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार या घटना संकलित केलेल्या आहेत. सर्व घटना नजीकच्या काळातील आहेत, तारखांमध्ये कमी-अधिक फरक असू शकतो.)

Rape Cases In Maharashtra Increased Opposition Slams CM Uddhav Thackeray Govt

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण